पुणेरी वडापावने सिल्लोडच्या लहानशा हातगाडीपासून सुरुवात करत संपूर्ण महाराष्ट्रभर आपला विस्तार वाढवला आहे. छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) मधील टीव्ही सेंटर, सिडको, कनॉट गार्डन, तसेच भुसावळ, बुलढाणा, चिखली, बीड, अंबेजोगाई, जालना, राजूर, श्रीगोंदा, अहिल्या या अनेक ठिकाणी शाखा सुरु केल्या. या प्रवासात ग्राहकांची जिव्हाळ्याची साथ लाभली. या यशानंतर लवकरच पुणेरी वडापाव गोवा, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेशातही विस्तारासाठी सज्ज होत आहे.
23 मार्च 2018 रोजी "पुणेरी मिसळ" हा ब्रँड लॉन्च करण्यात आला, ज्याने स्थानिक नेहमीच्या मिसळला एका वेगळ्या स्तरावर पोहोचवले. यानंतर, 05 जानेवारी 2020 रोजी जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे पहिले फ्रँचायसी आउटलेट सुरू झाले. हा विस्तार माझ्या, माझ्या पत्नीच्या आणि पुणेरी वडापाव संघाच्या अथक परिश्रमांचा परिणाम होता.
जून 2015 मध्ये, काहीतरी नवीन करण्याच्या इच्छेने पुण्यातून छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद ) जिल्ह्यातील सिल्लोड येथे स्थलांतर केले. 05 सप्टेंबर 2015 रोजी "श्री गुरुदत्त पेटपूजा कॉर्नर" नावाने हातगाडी सुरू केली. लोकांनी दिलेल्या "पुणेरी वडापाव" या नावाने वडापावला नवीन ओळख मिळाली. गुणवत्तापूर्ण चव, स्वच्छता, ग्राहकांशी जिव्हाळ्याचे नाते आणि प्रामाणिक सेवा या तत्त्वांवर आधारित हा ब्रँड विकसित झाला.
माझा जन्म 1988 साली झाला. शिक्षण घेत असतानाच मी 2008 मध्ये व्यवसायात पदार्पण केले. "अंबिका चायनीज" नावाने हॉटेल व्यवसायाची सुरुवात केली. यानंतर हॉटेल अंबिका, हॉटेल पद्मावती, श्री गणेश वडापाव सेंटर अशा वेगवेगळ्या नावांनी व्यवसायाचा अनुभव घेतला. आठ वर्षांच्या अनुभवातून व्यवसायाची उत्तम समज आणि आत्मविश्वास मिळाला.
1985 साली, माझ्या वडिलांनी व्यवसायाचा भार उचलून हॉटेलचे नामकरण "हॉटेल दोस्ती" असे केले. चहासोबत गरमागरम वडापाव, झणझणीत मिसळ पाव यासारखे पदार्थ ग्राहकांसाठी सुरू केले. 1992 च्या दुष्काळामुळे हॉटेल बंद करून, पुण्याला स्थलांतर करावे लागले.
शिंदे कुटुंबीयांचे मूळ गाव वालवड, ता. कर्जत, जिल्हा अहिल्यानगर (अहमदनगर). 1952 साली माझ्या पणजी सौ. जाईबाई शिंदे यांनी गावात चहाचे हॉटेल सुरू केले. त्यावेळी चहाची किंमत अवघी 5 पैसे होती. त्यांच्या मृत्यूनंतर आमचे आजोबा श्री मारुती शिंदे व श्री बबन शिंदे यांनी हा व्यवसाय पुढे नेला. या साध्या सुरुवातीने मोठ्या स्वप्नांची पायाभरणी झाली.
आता वेळ आहे तुम्हाला सोबत घेऊन तुमच्या व्यवसायाचा श्रीगणेशा करण्याची! महाराष्ट्रभर आपली ओळख निर्माण केलेल्या "पुणेरी वडापाव" ब्रँडसोबत तुम्हीही यशाचा प्रवास सुरू करू शकतात. दर्जेदार चव, परंपरेची ओळख, आणि ग्राहकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या सेवा ही आमची ओळख आहे. तुमच्या शहरात "पुणेरी वडापाव" सुरू करण्यासाठी आमच्याकडून संपूर्ण मार्गदर्शन, प्रशिक्षण, आणि मार्केटिंग सपोर्ट मिळेल.
पुणेरी वडापाव" हा केवळ एक ब्रँड नाही, तर एका उत्साह, समर्पण आणि कल्पकतेच्या प्रवासाचे प्रतीक आहे. पारंपरिक चवीचा प्रसार करण्याचा संकल्प आणि जिद्दीच्या जोरावर "पुणेरी वडापाव" ने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. आज आमचा प्रत्येक ग्राहक आमच्या या यशस्वी प्रवासाचा एक भाग आहे, जो पुढील अनेक राज्यांमध्ये हि चव पोहोचण्याच्या वाटेवर आहे!